Pm Modi in MP : काँग्रेसकडे दोनच शक्ती फूट आणि लूट : PM मोदींची घणाघाती टीका | पुढारी

Pm Modi in MP : काँग्रेसकडे दोनच शक्ती फूट आणि लूट : PM मोदींची घणाघाती टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस पापाच्या दलदलीमध्‍ये फसला आहे. केवळ द्वेष हेच काँग्रेसचे एकमेव काम आहे. गतवर्षी २०२३ मध्ये मध्य प्रदेशातून काँग्रेस सुटी झाली आहे. आता २०२४ मध्ये मात्र काँग्रेसचा सुफडा साफ होईल. काँग्रेसकडे ‘फूट अन् लूट, या दोनच शक्ती  आहेत, अशी घणाघाती टीका पंतपध्रान नरेंद्र माेदी यांनी आज (दि.११) केली. मध्य प्रदेशमधील झाबुआ येथे विकास काम प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Pm Modi in MP)

पंतप्रधान माेदी यांनी 7,550 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर त्‍यांनी आदिवासी महाकुंभातही सहभाग घेतला, ज्यामध्ये लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, मी येथे सेवक म्हणून आलो आहे.   (Pm Modi in MP)

Pm Modi in MP: पीएम मोदींचा जोरदार ‘रोड-शो’

यादरम्यान पीएम मोदींनी रोड शोही केला, जिथे ते खुल्या जीपमधून सभेच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा देत आणि फुलांचा वर्षाव करून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मोदींसोबत मुख्यमंत्री मोहन यादव आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हेही जीपमध्ये दिसले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केले.  (Pm Modi in MP)

लूट आणि फूट हा काँग्रेसचा प्राणवायू

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या चेंगराचेंगरी झाल्याचे ऐकू येत आहे. काँग्रेस आपल्या पापांच्या दलदलीमध्‍ये अडकली आहे, ती जितकी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल तितकी ती आणखी बुडेल. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांची दोनच ताकद आहेत, एक म्हणजे काँग्रेस सत्तेत असताना लुटण्याचे काम करते आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर लढण्याचे काम करते. लूट आणि फूट हा काँग्रेसचा प्राणवायू आहे, अशी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा 400 पार

आमच्यासाठी आदिवासी समाज ही व्होट बँक नसून, देशाचा अभिमान आहे. तुमचा सन्मान आणि तुमचा विकासही… ही मोदींची हमी आहे. यावेळी मोठ्या विरोधी नेत्यांनी आधीच सांगायला सुरुवात केली आहे की, 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा 400 चा आकडा पार करेल. मागच्या सरकारांनी ज्या समाजाला मागास ठरवून जंगलात बंदिस्त केले होते, त्या समाजाचा अभिमान आज संपूर्ण जगाला माहीत आहे. आम्हाला विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मध्य प्रदेशच्या विकासाचा हा संकल्प प्रवास अधिक वेगाने पुढे जाईल. असे देखील पीएम मोदी याावेळी म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button