श्रीकृष्णाच मंदिर झाल्याशिवाय आम्ही विराम घेणार नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

श्रीकृष्णाच मंदिर झाल्याशिवाय आम्ही विराम घेणार नाही : देवेंद्र फडणवीस

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : अयोध्येत प्रभु श्रीरामच मंदिर होवो ही आपल्या सर्वांचीच इच्छा होती.ती पूर्ण झाली आता मथुरेत प्रभू श्रीकृष्णाच मंदिर झाल्या शिवाय आम्ही विराम घेणार नाही,प्रभू श्रीकृष्णासाठी आपली जबाबदारी आहे.असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत गीताभक्ती अमृत महोत्सवात व्यक्त केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त आळंदीत गीताभक्ती अमृतमहोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीकृष्ण मंदिर निर्मितीचा मुद्दा बोलून दाखवला.

यावेळी व्यासपीठावर पीठाधीश शंकराचार्य महाराज,गोविंददेव गिरी महाराज,रामदेव बाबा ,आदेशानंद महाराज,राजेंद्रदास महाराज,काळसिद्धेश्वर महाराज कणेरी मठ,शांतीब्रम्ह मारुतीबाबा कुऱ्हेकर,चिदानंद सरस्वती महाराज,बाळकृष्ण महाराज,साध्वी भगवतीदेवी,रमेशभाई ओझा,माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे,आमदार उमा कापरे,अजय भुतडा,राजा लुईस उपस्थित होते.
मंदिर निर्मितीतुन आपली जुनी प्राचीन सनातन संस्कृती पुनर्स्थापित करण्याची आमची धारणा असल्याचे त्यांनी सांगितले.समर्थ रामदासांचा आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो या वचनाचा आधार देत त्यांनी श्रीराम मंदिर उभारण्यासाठी सरकारी निधीची गरज लागली नसल्याचे सांगितले तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे हा अभंग सांगत संतांचे मोठे कष्ट असल्याचे आवर्जून नमूद केले.

विद्यार्थी वसतिगृहाचे लोकार्पण

वारकरी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी सदन या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा

Back to top button