मला दिल्‍या जातायत बलात्कारासह जीवे मारण्याच्‍या धमक्‍या : स्वाती मालीवाल

मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा दावा आम आदमी पक्षाच्‍या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केला आहे. 
मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा दावा आम आदमी पक्षाच्‍या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केला आहे. 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा दावा आम आदमी पक्षाच्‍या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आज (दि.२६) केला. यूट्यूबर ध्रुव राठीने मारहाण प्रकरणी एकतर्फी प्रतिक्रियेचा व्हिडिओ केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आल्या आहेत. "आम आदमी पक्षाने माझे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला. असा दावा मालीवाल यांनी केला होता. आता बलात्कार आणि जीवे मारण्याच्या दिल्या जात आहेत. असा दावा त्‍यांनी 'एक्स' वर काही स्क्रीनशॉट पोस्ट करत मालीवाल यांनी केला आहे." या पोस्टमध्ये मालीवाल यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये त्यांना धमकी दिल्याचे दिसत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली असून ते तपास करतील असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

स्वाती मालीवाल यांनी पोस्टमध्ये यूट्यूबर ध्रुव राठी यांच्यावरही निशाणा साधला. "स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण संबंधिचा ध्रुव राठी यांचा व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या सारखा आहे. ध्रुव राठी यांना माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी माझे कॉल आणि मेसेज घेण्याचे टाळले." असेही मालीवाल म्हणाल्या.

"ध्रुव राठी यांनी त्यांच्या अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, आम आदमी पक्षाची बाजू मांडली असून, अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. आम आदमी पक्षाने मारहाण प्रकरणावर यूटर्न का घेतला?, अर्धवट व्हिडिओ व्हायरल का केले गेले? विभव कुमार यांचा फोन फॉरमॅट का झाला? या गोष्टींकडे ध्रुव राठींनी लक्ष दिले नाही." असेही स्वाती मालीवाल यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news