बेळगाव : माजी आमदार संजय पाटील यांना मातृशोक | पुढारी

बेळगाव : माजी आमदार संजय पाटील यांना मातृशोक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : हालोंडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील कुसुम बाळासाहेब पाटील (वय 90) यांचे रविवारी (दि.26) बेळगाव येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार आणि गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता संजय पाटील आणि कोल्हापुरातील भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

कुसुम पाटील हालोंडी ग्रामपंचायतच्या माजी सदस्या, तसेच विविध संस्थांच्या मार्गदर्शक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्यावर रविवारी (दि.26) सायंकाळी पाच वाजता हालोंडी (ता. हातकणंगले) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी काही काळ बेळगाव येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. शहर परिसरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button