Tripura civic polls: त्रिपुरामधील निवडणुका हिंसाचारमुक्त वातावरणात घ्‍या : सर्वोच्च न्यायालय | पुढारी

Tripura civic polls: त्रिपुरामधील निवडणुका हिंसाचारमुक्त वातावरणात घ्‍या : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Tripura civic polls ) भय आणि हिंसाचारमुक्त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र तसेच राज्य सरकारला दिशानिर्देश जारी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ( Tripura civic polls ) पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तसेच विरोधातील तृणमूल काँग्रेस हे आमने-सामने आलेले आहेत. त्रिपुरामध्ये सरकारपुरस्कृत हिंसाचार सुरू असल्याचे सांगत तृणमूलने अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Tripura civic polls : ‘सीएसीएफ’ दोन तुकड्या उपलब्ध करून द्याव्यात

त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भय आणि हिंसाचारमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी केंद्रीय लष्करी पोलीस दलाच्या (सीएसीएफ) दोन तुकड्या उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश न्यायालयाने आजच्या सुनावणीवेळी केंद्रीय गृह मंत्रालयाला दिले.

मतपेट्यांची सुरक्षा तसेच शांततेत मतमोजणी होण्याच्या अनुषंगाने केंद्र आणि त्रिपुरा सरकारने आवश्यक ते उपाय योजावेत, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून येत्या रविवारी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारपर्यंत सीएसीएफच्या तुकड्या तैनात ठेवल्या जाणार आहेत.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ : काेराेना लस : बूस्‍टर डाेसच गरज आहे का ?

 

 

Back to top button