Terror funding: 'एनआयए'चे जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्‍त | पुढारी

Terror funding: 'एनआयए'चे जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्‍त

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरविल्‍याप्रकरणी (Terror funding ) राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आज मोठी कारवाई केली. श्रीनगरसह अनेक ठिकाणी छापे टाकले. स्‍थानिक पोलिस आणि केंद्रीय निम्‍मलष्‍करी राखील पोलिस दलाच्‍या मदतीने एनआयएने ही धडक कारवाई केली.

जम्‍मू-काश्‍मीरसह देशातील अनेक भागात दहशतवादी हल्‍ले घडवून आणण्‍यासाठी कट जैश, लष्‍कर-ए-तोयबा, हिजबुल, तैहरीक-ए-इस्‍लामी या दहशतवादी संघटनांनी रचल्‍याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी उत्तर आणि दक्षिण काश्‍मीरमधील अनेक जणांना अटकही करण्‍यात आली होती.

दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरविल्‍याप्रकरणी (Terror funding ) श्रीनगर मानवाधिकार कार्यकर्ता खुर्रम परवेज याला सोमवारी अटक करण्‍यात आली. खुर्रमच्‍या घरासह कार्यालयावरही छापा टाकण्‍यात आला. या कारवाईत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आले आहेत. ‘एनआयए’च्‍या पथक त्‍याला घेवून दिल्‍लीला रवाना झाले होती. त्‍याची एनजीओ व ट्रस्‍टला देशातून तसेच विदेशातून धर्मदायच्‍या नावाखाली तो देणगी गोळा करत होता.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button