'डंके की चोट'पर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, शरद पवारांनी विश्वासघात केला
शरद पवार यांनी कष्टकरांच्या विश्वासघात केला आहे, हे मी डंके की चोटपर सांगतो, असा आरोप ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर आता कामगारांना तोडण्याचे काम शरद पवार यांच्या टोळीने केले आहे. आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगारवाढ जाहीर केली. हे करताना सरकार किती चुकीचे असू शकते याचे मूर्तीमंत उदाहारण ही पत्रकार परिषद होय. पगारवाढ देताना ते म्हणाले की पगार वेळेत होत नव्हते, पगार न देणारे सरकार किती खोटे आहे हे आज उघड झाले आहे.
आता इन्सेंटिव्हचे आमिष दाखवून ते नफेखोरीची भाषा ते करत आहे. विलीनीकरणाबाबत चालढकल सुरू असून हे सरकार उच्च न्यायालयाला टूल म्हणून वापरत आहे. तुम्ही निर्णय घेऊच नका, असे उच्च न्यायालय कधीच म्हणत नाही. ईडीची नोटीस मिळालेले परब आज स्पष्टीकरण देत आहेत. ते ईडीतून सुटणार नाहीत. आज शरद पवार यांनी विश्वासघात केला आहे. परब यांनी अमानुष घोषणा केली आहे.’
हेही वाचा :