खासगी शाळांच्या शुल्ककपातीचा निर्णय कागदावरच! | पुढारी

खासगी शाळांच्या शुल्ककपातीचा निर्णय कागदावरच!

पुणे : गणेश खळदकर : सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या खासगी शाळांमधील शालेय शुल्कात यंदा 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या निर्णयाला अनेक शाळांनी केराची टोपली दाखवत सरसकट 100 टक्के शुल्क आकारणी सुरू केली आहे. यावरून शाळांची शुल्ककपात कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.

‘विराट कोहली-राहुल द्रविड जोडी जमणार कारण द्रविड…’

यंदा शुल्ककपात आहे की नाही, याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने देऊन भरारी पथकांच्या माध्यमातून शाळांच्या शुल्काची तपासणी करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना, तसेच पालकांकडून केली जात आहे. दिवाळीनंतर दुसर्‍या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून प्रारंभ झाला. शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत, तर उर्वरित वर्गांचे शिक्षण अद्यापि ऑनलाइन पद्धतीनेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

खासदार गौतम गंभीर यांना ‘इसिस काश्‍मीर’कडून ठार मारण्याची धमकी

सलग दुसर्‍या वर्षी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू असल्यामुळे काही प्रमाणात शाळांच्या खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे यंदा शंभर टक्के फी आकारण्यात येऊ नये. त्यामध्ये काही प्रमाणात सवलत द्यावी, अशी मागणी पालकांतून होत होती. त्यावर खासगी शाळांमधील शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यामुळे पालकांना थोडासा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, आता संस्थाचालकांकडून पालकांवर शुल्क लवकर भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती पालक देत आहेत. त्यामुळे यंदा शुल्ककपात झाली की नाही, यावरूनच संभ्रम निर्माण झाला आहे.

जुन्नर : अनंत नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा, व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या

शुल्ककपातीसंदर्भात शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना विचारले असता, शुल्कावरून शाळांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, त्यामुळे कारवाई करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. तरीदेखील वरीष्ठ पातळीवर चर्चा करून या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

Back to top button