

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
खून, खूनाचा प्रयत्न, दुखापत, गर्दीमारामारी, जबरी चोरी, चोरी घरफोडी, खंडणी असे 48 गुन्हे दाखल असलेल्या भास्कर टोळीच्या पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. अमोल महादेव भास्कर (वय ३८), महादेव शामराव भास्कर (६१), अमित उर्फ पिंटु महादेव भास्कर (३३), शंकर शामराव भास्कर (५३), संकेत सुदेश व्हटकर (२२) अशी संशयितांची नावे आहेत.
सेवानिवृत्त जेष्ठ नागरीकाने सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीयांची भविष्याची सोय म्हणून सन १९९९ साली सौ.स.नं. २८९२ क बी वॉर्ड जवाहरनगर कोल्हापूर येथे प्राईम लोकेशनला ३६९.३७ चौ. मि. प्लॉट खरेदी केला होता. बाजारभावाप्रमाणे ८० ते ९० लाख रुपये किंमत आहे. सदर प्लॉट भोवती फिर्यादी यांनी कंपाऊंड करुन त्यास कुलूप लावून बाळकावण्याचा प्रयत्न भास्कर टोळीने केला. या गुन्ह्यात पाचही संशयित अटक आहेत.