दबावाखाली असलेल्या जोखडातून शेतकरी मुक्त : संजय राऊत | पुढारी

दबावाखाली असलेल्या जोखडातून शेतकरी मुक्त : संजय राऊत

नाशिक; पुढारी ऑनलाईन

दीड वर्षापासून शेतकरी तणावाखाली आहे. दबावाखाली असलेल्या जोखडातून शेतकरी मुक्त झाला. आंदोलनात मंत्र्यांनी गाडीखाली शतकऱ्यांना चिरडलं. ऊन- वारा पावसात शेतकरी बसला. पोलिसांनी पाण्याचे फवारे केले. पण, त्यांच्या संघर्षासमोर सरकारला झुकावं लागलं, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत माध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांना गुलाम बनवणारा कायदा मुक्त झाला. विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही. कंगना रणौत म्हणते ते स्वातंत्र्य नाही. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं. ७०० शतकऱ्यांनी बलिदान दिलं. असेही राऊत यांनी नमूद केले.

विधान परिषद उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना राऊत पुढे म्हणाले की रामदास कदम शिवसेनेचे कडवट नेते आहेत. सुनील शिंदे यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळालं. रामदास कदम यांना उमेदवारी नाकारल्याबद्दल मी बोलणार नाही.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. परिवहनमंत्री अनिल परब दिवसभर चर्चा करताहेत, असेही राऊत यांनी नमूद केलं.

Back to top button