चंद्रपूर : नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी युवकास अटक | पुढारी

चंद्रपूर : नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी युवकास अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नाल्यात फेकून दिल्याने एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१) उघडकीस आली होती. चिमुर तालुक्यातील बोडदा येथील हनुमान मंदिरासमोरील नाल्यात हे मृत अर्भक आढळून आले होते. याप्रकरणी मोहीत मोहनलाल  नागोसे (वय २१) या युवकाला पोलिसांनी आज (दि.७) ताब्यात घेतले आहे. आढळलेले नवजात अर्भक दोन ते तीन दिवसाची बालिका असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बोडदा गावातील नाल्यात बुधवारी (दि.१) सायंकाळी चारच्या सुमारास काही नागरिकांना नवजात अर्भक दिसून आले. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेतले. हे मृत अर्भक बालिका असल्याने याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता. त्यानुसार पोलिसांनी नवजात अर्भकाच्या मातेचा शोध घेऊन तिची चौकशी केली. अनैतिक संबंधातून झालेल्या नवजात बाळामुळे गावात व समाजात बदनामी होईल, या भितीने अर्भकाला नाल्यात फेकून दिल्याची कबुली मातेने दिली. तसेच तिने दिलेल्या माहितीवरून अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी गावातील मोहीत नागोसे या युवकाला आज पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा :

Back to top button