राज्यात हॉटेल, बारमध्ये दारू पिणे महागणार; VATमध्ये दुप्पट वाढ | Vat on Hotel liquors in Maharashtra | पुढारी

राज्यात हॉटेल, बारमध्ये दारू पिणे महागणार; VATमध्ये दुप्पट वाढ | Vat on Hotel liquors in Maharashtra

पुढारी ऑनलाईन : राज्यात हॉटेल, बार, लाऊंज, कॅफे येथे दारू पिणे महागणार आहे. सरकारने हॉटेल, लाऊंज, बार, कॅफेमधील दारू विक्रीवरील व्हॅट १ नोव्हेंबरपासून ५ टक्केंनी वाढवला आहे. सध्या हा कर ५ टक्के आहे. पण दारू दुकानातून होणाऱ्या विक्रीवरील कर जैसे थे ठेवण्यात आलेला आहे. तसेच स्टार हॉटेल्समधील दारूवर यापूर्वीच २० टक्के व्हॅट असल्याने तो ही कर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. (Vat on Hotel liquors in Maharashtra)

हॉटेल्स, रेस्टॉरंटस ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “ही करवाढ धक्कादायक आहे. वार्षिक अबकारी कर यापूर्वीच वाढलेला आहे. या करवाढीमुळे हॉटेल आणि बारमधील दारू महाग होणार आहे. पर्यटन वाढवण्यासाठी राज्यांत स्पर्धा सुरू आहे. गोवा, छत्तीसगड आणि हरियाणा या राज्यांतील अबकारी कर कमी आहे.” हॉटेल आणि बारमधील दारू महागल्यानंतर लोक स्वस्तातील पर्याय शोधतील, असे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button