अहमदनगर : डेंगीसदृश आजाराने तरुणीचा मृत्यू | पुढारी

अहमदनगर : डेंगीसदृश आजाराने तरुणीचा मृत्यू

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील टीव्ही सेंटर परिसरात राहणार्‍या तरुणीचा डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला. सिमरन लालय्या विद्ये (वय 23) असे तिचे नाव आहे. ती इंजिनीअर होती. शिक्षण पूर्ण झाल्याने सिमरन विद्ये शहरातील टीव्ही सेंटर परिसरात आई-वडिलासमवेत राहत होती. 5 जून रोजी तिला ताप आला. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तिने औषध घेतले होते. परंतु, 6 जून रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला पोटविकार तज्ज्ञांकडे नेले. त्यांनी डेंगीसह अन्य चाचण्या करण्यास सांगितले.

त्यानुसार 7 जून रोजी बालिकाश्रम रस्त्यावरील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले. तेथे रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर तिला डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु 8 व 9 जूनला तिची प्रकृती जास्त खालवली. 9 जून रोजी सकाळी तिचे निधन झाले. तिच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते लालय्या विद्ये हे तिचे वडील होत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र अद्याप याची दखल घेतलेली नाही.

याबाबत महापालिका आरोग्य विभागाकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. संबंधित खासगी हॉस्पिटलकडून माहिती घेण्यात येईल.

– डॉ. अनिल बोरगे,
वैद्यकीय अधिकारी, महापालिका

हेही वाचा

अहमदनगर : ओपन प्लॉटधारकांना नोटिसा काढा; पालिका आयुक्तांचा आदेश

तीन हजार वर्षांपूूर्वीची तळपती तलवार

पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या; फक्त 228 हेक्टरवर पेरणी

Back to top button