तीन हजार वर्षांपूूर्वीची तळपती तलवार

तीन हजार वर्षांपूूर्वीची तळपती तलवार
Published on
Updated on

बर्लिन : जर्मनीमध्ये उत्खननात तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीच्या तलवारीचा शोध घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे अद्यापही ही तलवार सुस्थितीत आहे. तिला कांस्य धातूची मूठ आहे. दोनाओ-रीस येथे करण्यात आलेल्या उत्खननात ही तलवार सापडली. हजारो वर्षांपूर्वीच्या या तलवारीची चमक आजही कायम असल्याने संशोधकही चकीत झाले.

या तलवारीला अष्टकोणी मूठ आहे. अशी मूठ पूर्णपणे कांस्य धातूपासून बनवली जात असे. एका दफनभूमीत मृतदेहाशेजारी ठेवलेल्या अनेक वस्तूंपैकी एक असलेली ही तलवार आहे. याठिकाणी बाणाचेही अनेक तुकडे सापडले आहेत. याठिकाणी तीन लोकांना दफन करण्यात आले होते. त्यांचे अवशेष इथे सापडले आहेत. त्यामध्ये एका व्यक्तीच्या जबड्याचाही समावेश आहे. याशिवाय फोमसारखीही एक वस्तू याठिकाणी सापडली आहे. याठिकाणी कुणाला दफन केले होते याबाबत स्पष्टता नाही. मात्र, एखाद्या संपन्न व प्रभावशाली कुळातील व्यक्तींना इथे दफन केले असावे असे दिसून येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news