चाकण : कांदा तेजीत; बटाट्याचे दर उतरले | पुढारी

चाकण : कांदा तेजीत; बटाट्याचे दर उतरले

चाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, परवल व हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली. कांदा व टोमॅटोचे भाव तेजीत राहिले. लसणाची आवक घटून भाव स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व शेपूच्या भाजीची आवक घटली, तर पालक व कोथिंबिरीची उच्चांकी आवक झाली.

सातार्‍याहून आले, मुरबाडहून भेंडी व गुजरातहून चक्राकार डांगर भोपळा, तोतापुरी कलमी आंबा व परवलची प्रचंड आवक झाली. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्सी गाय, शेळ्या-मेंढ्या व म्हैस यांच्या संख्येत मोठी वाढ झाली, तर बैलांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 4 कोटी 15 लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण आवक 2,600 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 850 क्विंटलने घटली. भावात 100 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1100 रुपयांवरून 1200 रुपयांवर पोहचला. बटाट्याची एकूण आवक 1500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 500 क्विंटलने वाढल्याने भावात 200 रुपयांची घट झाली.

बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवरून 1,800 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 55 क्विंटलने घटल्याने कमाल भाव 8 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 375 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 50 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक – 2,600 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,200 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000, भाव क्रमांक 3. 700. बटाटा : एकूण आवक – 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,800 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500, भाव क्रमांक 3. 1,100.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 312 क्विंटल (800 ते 1,000 रुपये), कोबी – 190 क्विंटल (500 ते 800), फ्लॉवर – 197 क्विंटल (600 ते 900), वांगी – 83 क्विंटल (1,000 ते 2,000), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 55 क्विंटल (5,000 ते 7,000), शेवगा – 30 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 105 क्विंटल (1,500 ते 2,000). पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 26 हजार 500 जुड्या (800 ते 1,200 रुपये), कोथिंबीर – एकूण 28 हजार 950 जुड्या (500 ते 1,500 रुपये), शेपू – एकूण 3 हजार 550 जुड्या (800 ते 1,200 रुपये), पालक – एकूण 4 हजार 260 जुड्या (400 ते 600 रुपये).

जनावरे : विक्रीसाठी आलेल्या 42 जर्शी गायींपैकी 22 गायींची विक्री झाली (15,000 ते 65,000 रुपये), 110 बैलांपैकी 95 बैलांची विक्री झाली (15,000 ते 50,000 रुपये). 140 म्हशींपैकी 115 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 80 हजार रुपये भाव मिळाला. 10,750 शेळ्यांपैकी 10,280 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Back to top button