Shardul Thakur : बॉलिंग टाकतो क्विक… शार्दूल ठाकूरचा क्रिकेटिंग उखाणा व्हायरल | पुढारी

Shardul Thakur : बॉलिंग टाकतो क्विक... शार्दूल ठाकूरचा क्रिकेटिंग उखाणा व्हायरल

मुंबई; वृत्तसंस्था : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर नुकताच आपली मैत्रीण मिताली परूळेकरशी विवाह बंधनात अडकला. आता शार्दूलचा मराठीतून घेतलेला फर्मास उखाणादेखील व्हायरल होत आहे. मितालीसाठी खास आपल्या शैलीत उखाणा तयार केला. तो म्हणतो, ‘बॉलिंग टाकतो क्विक, रनही धावली क्विक.. मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक!’ त्याचा हा क्रिकेटिंग उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Shardul Thakur)

त्याने कर्जत येथील फार्म हाऊसवर आपल्या काही निवडक मित्र आणि कुटुंबीयांसोबत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. शार्दूलच्या हळदीपासून सात फेर्‍यांपर्यंतच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. (Shardul Thakur)

शार्दूल आणि मिताली एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, त्यांच्यात मैत्रीनंतर प्रेम निर्माण झाले आणि अखेर ते लग्नबंधनात अडकले. 31 वर्षीय शार्दूलचा संगीत आणि हळदी समारंभही उत्साहात पार पडला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांसारख्या स्टार क्रिकेटपटूंनीदेखील हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

या दोघांनी 29 नोव्हेंबर 2021 मध्ये मुंबईत एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता. साखरपुड्याचे ठिकाण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मनोरंजन केंद्र होते.


अधिक वाचा :

Back to top button