चेन्नई; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर जोर देण्याच्या द्रमुकच्या प्रयत्नावर मोठे विधान केले आहे. भारत हा विविधतेत एकता असलेला देश असल्याचे ते म्हणाले. जर आपण विविधतेचे रक्षण केले तर आपण एकतेचे रक्षण करू आणि म्हणून मला वाटते की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताला एकत्र करण्याचा प्रयत्न करणे ही चांगली सुरुवात आहे. मला आशा आहे की विरोधक मजबूत होतील आणि इतर नेतेही असाच विचार करतील. आपला देश सुखी व संपन्न आहे, त्याला पुढे नेऊ. (Opposition Unity)
विरोधी पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, जेव्हा आपण सर्व एकत्र येऊन जिंकू, तेव्हाच आपण ठरवू या की देशाचे नेतृत्व करण्यासाठी आणि एकजूट करण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती कोण आहे. एमके स्टॅलिन हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात का, असे विचारले असता फारुख अब्दुल्ला म्हणाले की का नाही? स्टॅलिन पंतप्रधान का होऊ शकत नाही? काय चुकीच आहे त्यात? (Opposition Unity)
सध्या पंतप्रधान कोण होणार हे विसरुया, आधी २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकूया, असे फारुख अब्दुल्ला चेन्नईतील द्रमुकच्या बैठकीत म्हणाले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपले म्हणणे मांडले. फुटीरतावादी शक्तींविरोधात सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे ते म्हणाले. कोण नेतृत्व करेल किंवा पंतप्रधान कोण होईल हे मी कधीच सांगितले नाही. हा प्रश्न नाही. आम्हाला एकजुटीने लढायचे आहे, ही आमची इच्छा आहे. (Opposition Unity)
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, तामिळनाडूमध्ये काँग्रेस-डीएमके युतीने २००४, २००९ च्या लोकसभा निवडणुका आणि २००६ व २०२१ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. लोकसभा विजयासाठी आपण आपल्या आघाडीचा आणि नेतृत्वाचा पाया मजबूत करणे सुरू ठेवले पाहिजे. खर्गे पुढे म्हणाले, भाजप सरकारच्या अपयशामुळे २३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली ढकलले गेले आहेत. सर्वसामान्य माणूस महागाईने वैतागला आहे, तरुणाई बेरोजगारीने त्रस्त आहे, पण भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण करण्यात रस आहे.
अधिक वाचा :