कोल्‍हापूर : टाकळीवाडीतील सख्ख्या भावांची एकाच वेळी भारतीय सेनेत निवड | पुढारी

कोल्‍हापूर : टाकळीवाडीतील सख्ख्या भावांची एकाच वेळी भारतीय सेनेत निवड

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील उमेश सतीश वंजीरे (वय 20) व अंकुश सतीश वंजारे (वय 21) या दोघा सख्या भावांची एकाच वेळी भारतीय सेनेत निवड झाली.

लहानपणापासूनच त्यांना भारतीय सेनेबद्दल आदर होता. शिवाय देशसेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. शालेय जीवनात धावणे व इतर खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले होते. शालेय जीवनात या दोघा भावांनी नेहमीच बक्षीसे मिळवली होती.

दरम्‍यान दोघा भावांनी सैन्यात भरतीसाठी एकत्र अभ्‍यास आणि सराव सुरू केला होता. त्‍यातच एकाच वेळी दोघाही भावांची भारतीय सेनेत भरती झाल्‍याने परिसरात हा चर्चेचा तसेच कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यांना येथील ऑर्डीनरी कॅप्टन रमेश निर्मळे, तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे, तसेच सैनिक फेडरेशन आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

Back to top button