मुलगी उत्तीर्ण झाल्यावर आईने कुजकट शेजार्‍यांसमोर वाजवला ढोल!

मुलगी उत्तीर्ण झाल्यावर आईने कुजकट शेजार्‍यांसमोर वाजवला ढोल!
Published on
Updated on

नवी दिल्ली : 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हटले जाते. बर्‍याच लोकांना दुर्दैवाने असलाच शेजार मिळतो! कुजकट मनोवृत्तीचे असे शेजारी अगदी लहान मुलांबाबतही वाईट शेरे मारण्यास लाजत नाहीत. शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. तर काही विद्यार्थी कधी अभ्यास न केल्याने, तर कधी परिस्थितीमुळे नापास होतात. पण, कुटुंबीयांपेक्षा अशा शेजारपाजारच्यांकडून किंवा नातेवाईकांकडूनच मुलांना अधिक टोमणे सहन करावे लागतात.

मुलांना चारचौघात चिडवलं जातं. याचा खोल परिणाम मुलांच्या बाल मनावरही होतो. यामुळे मुलं एकलकोंडी होऊ लागतात. या प्रश्नाशीच जोडलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ अशाच टोमणे मारणार्‍या आणि टीका करणार्‍यांसाठी सणसणीत चपराक लगावणारा आहे. एक मुलगी सलग दोन वर्ष परीक्षेत नापास झाली. पण, यानंतरही तिने जिद्द सोडली नाही. तिसर्‍या प्रयत्नात तिने पास होऊन दाखवलं. मुलीच्या यशावर तिच्या आईने अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त करत शेजारच्यांची तोंडे बंद केली.

सोशल मीडिया एक्सवर हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओबरोबर एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. दोन वर्ष परीक्षेत अपयश आल्याने परिसरात राहाणार्‍या शेजारच्यांकडून मुलीला येता-जाता टोमणे ऐकावे लागत होते. मुलगी दहावीची परीक्षा देत होती. पण, तिला दोनवेळा अपयशाचा सामना करावा लागला. दोन वर्ष नापास झाल्याने शेजारी आणि नातेवाईकांकडून मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर टीका केली जाऊ लागली. मुलगी कधीच पास होऊ शकत नाही, तिचं पुढे काहीच होणार नाही, असं ऐकवलं जाऊ लागलं; पण मुलगी हिंमत हरली नाही. तिसर्‍या प्रयत्नात मुलीने दहावीची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन दाखवले.

मुलीच्या या यशाने तिची आई आनंदाने भारावून गेली. जे शेजारी टोमणे मारत होते, त्यांच्या घरासमोर जाऊन मुलीच्या आईने ढोल वाजवला आणि टोमणे मारणार्‍या शेजारच्यांची तोंडे बंद केली. पण, मुलीला आईचा हा पवित्रा फारसा आवडलेला दिसत नाही. या व्हिडीओत मुलगी आपल्या आईला थांबवताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत सहा हजार लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेक युजर्सनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. एका युजरने म्हटलंय त्या मातेने शेजारच्यांना जशास तसं उत्तर दिलंय; तर एकाने म्हटलंय, त्या माऊलीला सॅल्यूट. टोमणे मारणार्‍या शेजारच्यांना योग्य भाषेत उत्तर दिल्याचं अनेकांनी म्हटलंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news