Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकले | पुढारी

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकले

पुढारी ऑनलाईन : फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जगभरातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. अर्थसंकल्प २०२३-२४ दरम्यान भारतीय उद्योगपती अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे. यामुळे उद्योगपती अदानी हे चौथ्या स्थानावरून थेट ११ व्या स्थानावर पोहचले आहे.

जगभरातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तीच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. गौतम अदानी यांचे शेअर्स कोसळले असून, त्यांचे नेटवर्थ 83.9 अब्ज डॉलर इतके झाले आहे. तसेच मुकेश अंबांनी यांनी 84.3 नेटवर्थसह गौतम अंबानी यांना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार अदानी हे आता ११ व्या नंबरवर आहेत. तर अंबानी हे नवव्या स्थानावर पोहचले आहेत. यापूर्वी गेल्या चोविस तासांत अदानी यांचे १० अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याने ते चौथ्या स्थानावरून थेट ११ व्या स्थानावर आले होते.

Back to top button