दहावीच्या परीक्षेचा उद्या निकाल | पुढारी

दहावीच्या परीक्षेचा उद्या निकाल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 27) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी 2 जून रोजी निकाल लागला होता. यंदा सहा दिवस अगोदरच बोर्ड निकाल जाहीर करणार आहे.

बारावीचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील
1 लाख 30 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले. विभागात 356 परीक्षा केंद्रे होती. निकाल https:/// mahresult.nic.in, https:/// sscresult.mkcl.org, https:///sscresult.mahahsscboard.in व https:///result.digilockar.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल. डिजिलॉकरद्वारेदेखील निकाल पाहता येऊ शकतो, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.

Back to top button