Gambhir on Hardik : हार्दिक पंड्याचा बॅकअप शोधा, अन्यथा…; गौतम गंभीरने टीम इंडियाला दिला इशारा | पुढारी

Gambhir on Hardik : हार्दिक पंड्याचा बॅकअप शोधा, अन्यथा...; गौतम गंभीरने टीम इंडियाला दिला इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरने यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत भारतीय संघाला इशारा दिला आहे. त्याने म्हटले आहे की टीम इंडियाला लवकरच स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी बॅकअप शोधावा लागेल. यासोबतच इरफान पठाणने या बॅकअपसाठी काही पर्यायही दिले आहेत. (Gambhir on Hardik)

भारतीय संघाला २००७ टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या अनुभवी गौतम गंभीरने मोठे विधान केले आहे. यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत त्यांने भारतीय संघाला इशारा दिला आहे. गंभीरचा इशारा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याच्या दुखापतीबद्दल आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे अनेक दिवस भारतीय संघाच्याबाहेर आहे. पंड्याने आयपीएलसह टीम इंडियासाठी त्याने काही सामन्यांमध्ये गोलंदाजीही केली नाही. आता श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आणि मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेवर २ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Gambhir on Hardik)

हार्दिकच्या दुखापतीवरून गंभीरचा इशारा

टी-२० मालिकेत कर्णधाराची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्याकडे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास चाहत्यांना आणि दिग्गजांना वाटतो. त्यामुळेच त्यांच्याकडे आतापासून हळूहळू जबाबदारी देण्यात येत आहे.  श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला होता.

दुखापतीबद्दल आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलताना गौतम गंभीरने टीम इंडियाला हार्दिक पांड्याचा बॅकअप शोधण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच असा इशाराही दिला आला आहे की, जर आतापासूनच बॅकअप तयार केला नाही तर भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अत्यंत कठीण परिस्थितीत अडकू शकतो.

तर भारतीय संघ गंभीर संकटात सापडेल

स्टार स्पोर्ट्सच्या रोड टू वर्ल्ड कप ग्लोरी या कार्यक्रमात गौतम गंभीर म्हणाला, भारतीय संघाला हार्दिक पांड्याचा बॅकअप शोधण्याची नितांत गरज आहे. स्पर्धेदरम्यान हार्दिकला काही झाले तर भारतीय संघ खूप अडचणीत येऊ शकतो.

हार्दिकच्या बॅकअपसाठी इरफानने सुचवली नावे

हार्दिकचा बॅकअप म्हणून युवराज सिंगचे उदाहरण देताना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला की त्याने २०११ च्या विश्वचषकात स्पर्धेत ३६२ धावा करत १५ गडी बाद केले होते. पुढे तो म्हणाला, या परिस्थितीत दोन फिरकी अष्टपैलू खेळाडूही संघासाठी पुरेसे आहेत. वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि दीपक हुडा सारखे खेळाडू हे हार्दिकचे बॅकअप असू शकतात.

हेही वाचा;

Back to top button