गोवंश हत्या करून मांस विक्री करणाऱ्यावर पुन्हा पैठण पोलिसाची कारवाई | पुढारी

गोवंश हत्या करून मांस विक्री करणाऱ्यावर पुन्हा पैठण पोलिसाची कारवाई

पैठण पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या विशेष पथकाने पैठण शहरात गोवंश हत्या करून मांस विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मोहीम केली होती. यानंतर पुन्हा अवैधरित्या गायींची कत्तल करून मांस विक्री अड्यांवर पैठण पोलीस पथकाने शनिवारी दि.४ रोजी छापा टाकून तीन जनांविरुद्ध कारवाई केली. यानंतर विक्रीसाठी ठेवलेले मांस, जनावराचे कातडे, हत्या करण्यासाठी वापरण्यात येत असलेले हत्यार असे एकूण ८८ हजार मुद्देमाल जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील नेहरू चौक परिसरात खाटीक वाडा भागात गेल्या आठवड्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या विशेष पथकाने कारवाई करून देखील पुन्हा बेकायदेशीर गोवंश जनावराची हत्या करून मास विक्री करण्यात येत असल्याची, माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.३) रोजी बीट जमादार महेश माळी, अनिल गायकवाड, गोपनीय शाखेचे मनोज वैद्य, भाऊसाहेब वैद्य यांनी सापळा रचून गोवंश मांस विक्री होत असलेल्या ठिकाणी छापा मारला.

या ठिकाणी आरोपी वसीम महबूब कुरेशी, शहबाज शरीफ कुरेशी, शाहरुख मुस्ताक कुरेशी (सर्व रा. नेहरू चौक, पैठण) यांच्या ताब्यातील एकूण २५० किलो गोमांसासह इतर जनावराची हत्या करून मास विक्री करण्यासाठी साठा करून वेगवेगळ्या जातीच्या जनावराचे कातडी, गोवंश जातीचे मास व हत्यासाठी वापरत असलेले हत्यार असे एकूण ८८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पैठण पोलीस ठाण्यात भाऊसाहेब वैद्य यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास बीट जमादार महेश माळी हे करीत आहे.

हेही वाचा

Back to top button