नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत | पुढारी

नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस.जी.कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.

विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व एनडीएसटी सोसायटीचे संचालक दत्तात्रय आदिक यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्योत असलेल्या पणतीसह २०२३ अशी कवायत साकारून नववर्षाचे स्वागत केले.त्यांना मुख्याध्यापक संजय जाधव, क्रीडाशिक्षक शंकर गुरुळे,वैशाली पाटील,सुनीता शिंदे,रवींद्र कोकाटे,सुवर्णा मोगल,दत्तात्रय धरम,सुनील पगार,रामेश्वर मोगल,नानासाहेब खुळे,मंगला बोरणारे, ताराबाई व्यवहारे,रुपेश कुऱ्हाडे,बाळासाहेब गुरुळे, सोपान गडाख,रवी गडाख,नारायण भालेराव, अशोक कळंबे आदींनी परिश्रम घेतले.

संपू दे अंधार सारा…
समाजातील अंधकार नाहीसा होऊन पणतीच्या दिव्याच्या तेजाने आयुष्याची वाट पुन्हा एकदा उजळून निघावी, असा संदेश या कवायतीच्या माध्यमातून देत विद्यार्थ्यांनी नववर्षाचे स्वागत केले. – संजय जाधव, मुख्याध्यापक.

हेही वाचा:

Back to top button