जळगावात गोमूत्र पार्टी करत नववर्षाचे स्वागत | पुढारी

जळगावात गोमूत्र पार्टी करत नववर्षाचे स्वागत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगावातील रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये नव्या वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरनिमित्त जळगावमध्ये गोमूत्र प्राशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

नवीन वर्षाचे स्वागत म्हटले की, अनेकजण दारू, मटण खाऊन पार्टी करतात. आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रातील गोभक्त दरवर्षी गोमूत्र पिऊन नववर्षाचे स्वागत करतात. यावर्षीही मोठ्या उत्साहाने या गोभक्तांनी गोमूत्र पार्टीचे आयोजन केले होते. गोमूत्र नियमित पिण्याने आरोग्य उत्तम राहते. तसेच आयुष्य वाढते अशी या गोभक्तांची श्रद्धा आहे. शिवाय गोमूत्र पिण्याने दारू पिण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे दारू, मटणापासून दूर राहण्याचा हा उत्तम पर्याय असल्याचेदेखील आयोजकांनी सांगितले. आम्ही सर्व गोभक्त आपल्या कुटुंबासह एकत्र येऊन हा उपक्रम राबवत असतो. दारू पिणारे कुटुंबाला सोडून एकटेच दारू प्यायला जात असतात. रस्त्यावर लोळतात त्यापेक्षा गोमूत्र पिणे हे कधीही चांगले. ते शरीरासाठी फायदेशीरच असल्याचे बाफना गोशाळेचे व्यवस्थापक अभय सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button