Crocodile : मगरीने गट्टम केला ड्रोन! | पुढारी

Crocodile : मगरीने गट्टम केला ड्रोन!

न्यूयॉर्क : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका मगरीचे (Crocodile) ड्रोनद्वारे व्हिडीओ शूटिंग सुरू असताना तिने असे काही केले आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या मगरीचे लक्ष भिरभिरत असलेल्या ड्रोनकडे गेले व तिला हा एखादा पक्षीच असावा असे वाटले. आपले हे भक्ष्य पकडण्यासाठी तिने पाण्याबाहेर उसळी घेतली आणि ड्रोनला जबड्यात पकडले!

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये नदीमध्ये पोहणार्‍या मगरीच्या (Crocodile) जवळून एक ड्रोन उडताना दिसत आहे. थोड्या वेळाने ती एक मगर पाण्याबाहेर डोकावत ड्रोनकडे बघताना दिसत आहे. मगरीला ड्रोन दिसल्याचे समजताच ड्रोन पायलटने तो ड्रोन वर घेण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच काही क्षणात मगर ड्रोनवर झडप घालून त्याला आपल्या जबड्यात ओढून घेते.

हा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओखाली अनेक नेटकर्‍यांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. यामध्ये काहींनी ड्रोनच्या आवाजाने मगर (Crocodile) कशी चिडली हे लिहिले आहे, तर काहींनी ड्रोन पायलटने ही व्हिडीओ शूट करत असताना सुरक्षित अंतर कसे राखायला हवे होते याबाबतच्या कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button