Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीने सुरुवात | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीने सुरुवात

Stock Market Today : अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ कायम ठेवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. यामुळे अमेरिकेसह आशियाई बाजारात घसरण झाली आहे. याचे पडसाद शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातही उमटले. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरून ६०,३०० वर होता. तर निफ्टी १२० अंकांनी खाली येऊन १८ हजारांवर व्यवहार करत होता.

अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक १.१ टक्क्यांनी घसरला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक २.२ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, आशियाई बाजारांवर नजर टाकली तर शुक्रवारी टोकियोचे शेअर्स खाली आले. निक्केई निर्देशांक १.११ टक्के म्हणजेच २९३ अंकांनी घसरला. तर Topix निर्देशांक ०.७५ टक्क्यांनी घसरून १,८९३ वर आला. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button