सांगली : आजी-माजी सरपंचासह २० जणावर प्रतिबंधात्मक कारवाई | पुढारी

सांगली : आजी-माजी सरपंचासह २० जणावर प्रतिबंधात्मक कारवाई

जत, पुढारी वृत्तसेवा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या खैराव (ता.जत) येथील २० जणांना १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर अखेर जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहण्यास मनाई करण्याचा आदेश तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिला आहे. यात दोन माजी सरपंचासह, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

ही कारवाई माजी सरपंच दर्याप्पा धोंडीबा क्षीरसागर, माजी सरपंच राजाराम घुटुकडे, सुखदेव धोंडीबा क्षीरसागर, राजेश सुखदेव क्षीरसागर, संतोष महादेव निमग्रे, पांडुरंग नाना घुटुकडे, उत्तम धोंडीबा क्षीरसागर, नसरुद्दीन मुलानी, सुनील दर्याप्पा क्षीरसागर, पांडुरंग ईश्वर सांगोलकर, मुसाआली मुलांनी, राहुल सांगोलकर, ईश्वर धुळा खांडेकर, कुमार दामू काळे, सखाराम घुटुकडे, बंडू सोलनकर, दामू सदा काळे, तुकाराम काळे, सतीश सोलनकर, लक्ष्मण सोलनकर या वीस जणावार प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून वास्तव्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गत विधानसभा निवडणूक कालावधीत खैराव येथे दोन गटात हाणामारी झाली होती. याचबरोबर यापूर्वी खैराव येथे अन्य सामाजिक शांततेस बाधा येईल असे कृत्य घडले होते. या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्याने याबाबत संबंधितांना नोटीसा बजावल्या होत्या.

सद्यस्थितीत खैराव ग्रामपंचायतची निवडणूक सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया दरम्यान शांतता राहावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता यापूर्वी निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या संशियतावर निवडणूक काळात गावात तसेच जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव करण्यास मनाई करण्याचा प्रतिबंधात्मक आदेश तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे प्रस्तावित केला होता.

तहसीलदार बनसोडे यांनी याबाबत २० जणांना १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर अखेर गावात तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास प्रतिबंध कारवाई करण्यात आले. दरम्यान, वीस ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून मतदान करण्यासाठी दोन तासाचा कालावधी देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button