Swiggy order@2022: भारतीयांनी २०२२ मध्ये काय काय मागवले?; Swiggy ने जाहीर केली ऑर्डर केलेल्या पदार्थांची यादी | पुढारी

Swiggy order@2022: भारतीयांनी २०२२ मध्ये काय काय मागवले?; Swiggy ने जाहीर केली ऑर्डर केलेल्या पदार्थांची यादी

पुढारी ऑनलाईन: Swiggy या फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्मने २०२२ मध्ये भारतातील व्यक्तींनी काय काय खाण्यासाठी मागवले याची यादी जाहीर केली आहे. दोन वर्षाच्या कोव्हिड परिस्थितीनंतर २०२२ हे वर्ष प्रथमच कोणत्याही बंधनाशिवाय गेले. कोविड दरम्यान लोकांनी बाहेरचे खाणे, ऑर्डर देणे किंवा दिसणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी हँग आउट करणे टाळले. कोविड दरम्यानच्या काळात खाद्यपदार्थ आणि किराणा मालाच्या वितरणातही नवीन ट्रेंड (Swiggy order@2022) उदयास आले.

Swiggy order@2022 : सर्वाधिक बिर्याणीला पसंती

Swiggy च्या म्हणण्यानुसार, भारतीयांनी प्रति सेकंद २.२८ बिर्याणी ऑर्डर करून एक नवीन (Swiggy order@2022) विक्रम रचला आहे. केवळ बिर्याणीच नाही, तर भारतीयांनी रॅव्हिओली (इटालियन) आणि बिबिंबॅप (कोरियन) यांसारखे बिर्याणीचे विदेशी फ्लेवर्स देखील वापरून पाहिले. या काळानंतर हे प्रकार लोकप्रिय म्हणून उदयास आले. किराणा सामानाच्या जलद वितरणासाठी वापरकर्त्यांमध्ये Swiggy Instamart देखील अधिक लोकप्रिय ठरले.

यावर्षी सर्वाधिक मागवलेली डिश ही बिर्याणी होती. यूजर्संनी देखील Swiggy च्या या जाहीर केलेल्या यादीवर होय.. होय.. होय…’ असा प्रतिसाद दिला आहे. बिर्याणी ही सलग सातव्या वर्षी Swiggy वरून सर्वाधिक ऑर्डर (Swiggy order@2022) केलेली डिश बनली आहे. यावर Swiggy ने चिकन बिर्याणीची डिश दाखवत ‘ये साथ हम नहीं छोडेंगे!!’ असे म्हणत ग्राहकांच्यात आणखी उत्साह आणला आहे.

Swiggy या फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्मने २०२२ भारतीय खवय्यांकडून मागविण्यात आलेल्या इतरही काही पदार्थांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये चिकन बिर्याणी, मसाला डोसा, चिकन फ्राईड राईस, पनीर बटर मसाला, बटर नान, व्हेज फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी आणि तंदूरी चिकन हे Swiggy वरून सर्वाधिक ऑर्डर केलेले पदार्थ आहेत.

Swiggy order@2022: ‘या’ स्नॅक्सची सर्वाधिक मागणी

इटालियन पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाऊल, स्पायसी रामेन आणि सुशी यांसारखे परदेशी पदार्थही भारतीयांनी Swiggy वरून ऑर्डर केले आहेत. Swiggy च्या मतानुसार, त्यांच्या ऑनलाईन फूड प्लॅटफॉर्मवरून सर्वात जास्त १० प्रकारचा स्नॅक्स देखील मागविण्यात आला आहे. यामध्ये समोसा, पॉपकॉर्न, पावभाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडस्टिक्स, हॉट विंग्स्, टॅको, क्लासिक स्टफ्ड गार्लिक ब्रेड आणि मिंगल्स बकेटचा समवेश होता.

तसेच डेसर्टमध्ये (स्वीटडिश) गुलाबजामुन, रसमलाई, चोको लावा केक, रसगुल्ला, चोकोचिप्स आईस्क्रीम, अल्फोन्सो मँगो आईस्क्रीम, काजू कटली, टेंडर कोकोनट आइस्क्रीम, डेथ बाय चॉकलेट आणि हॉट चॉकलेट फज याचा समावेश असल्याचे Swiggy ने म्हटले आहे.

Swiggy च्या क्लाउड किचेन्सद्वारे गेल्या वर्षभरात विकल्या गेलेल्या सर्वाधिक पाककृतीत उत्तर भारतीय, चायनिज/पॅन आशियन, बिर्याणी, डेझर्टस् / आईस्क्रिम, बर्गर /अमेरिकन, साऊथ इंडियन अशा ऑर्डरचा समावेश आहे.

Swiggy ने एका निवेदनात म्हटले आहे की, स्विगी फूड मार्केटप्लेसने ग्राहकांना संपूर्ण भारतभर सेवा दिली. ग्राहकांनी त्यांची पहिली ऑर्डर श्रीनगर, पोर्ट ब्लेअर, मुन्नार, आयझॉल, जालना, भिलवाडा आणि अधिक शहरांमध्ये दिली. Swiggy Instamart वरून प्रथमच नवीन शहरांत काही मिनिटांत किराणा सामान ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आनंद अनुभवक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button