Lionel Messi Interview : वर्ल्ड कप उंचावताना तुला डोळे भरून पाहयचंय! महिला पत्रकार भावूक (Video) | पुढारी

Lionel Messi Interview : वर्ल्ड कप उंचावताना तुला डोळे भरून पाहयचंय! महिला पत्रकार भावूक (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यानंतर मेस्सीने (Lionel Messi Interview) एका महिला पत्रकाराला मुलाखत दिली. यावेळी पत्रकार मेस्सीसमोर भावूक झाली. पत्रकाराने अर्जेंटिनाच्या कर्णधाराचे जोरदार कौतुक केले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल तिने मेस्सीचे अभिनंदन केले.

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी स्वप्नपूर्तीपासून एक पाऊल पाठीमागे आहे. अर्जेंटिना कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. अंतिम सामन्यात त्यांचासमोर  गतविजेत्या फ्रान्सचे आव्हान आहे. अर्जेंटिनाने  उपांत्य फेरीत क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला. या विजयानंतर मेस्सी भावूक दिसला. त्याचे चाहतेही आनंदाश्रू रोखू शकले नाहीत. आपल्या आवडत्या खेळाडूने वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावून इतिहास रचावा यासाठी त्यांनी प्रार्थनाही सुरू केली. त्याच्यासोबतचं त्याचे जगभरातील चाहतेही भावूक झाले. (Lionel Messi Interview)

क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यानंतर मेस्सीने एका महिला पत्रकाराला मुलाखत दिली. यावेळी ती पत्रकार मेस्सीसमोर भावूक झाली. यावेळी तिने मेस्सीचे कौतुक करत अभिनंदन केले. ‘मला शेवटची गोष्ट सांगायची आहे की, विश्वचषक फायनल येत आहे आणि आम्हा सर्वांना चषक जिंकताना तुला पाहायचे आहे,’

मेस्सीसोबत बोलताना महिला पत्रकार म्हणाली, मी तुला एवढेच सांगू इच्छिते की सामन्याचा निकाल काहीही लागला तरी आम्हाला काही  फरक पडत नाही. अशी काही गोष्ट आहे जी तुझ्याकडून कोणीही घेऊ शकत नाही. स्पर्धेत तु अर्जेंटिनाच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करत आहेस. मी भावूक होत आहे, पण असे एकही मूल नाही ज्याच्याकडे तुमच्या नावाची जर्सी नाही. खरंच तू प्रत्येकाच्या आयुष्यात ठसा उमटवला आहेस. माझ्यासाठी ते कोणताही विश्वचषक जिंकण्यापलीकडटे आहे.

हेही वाचा;

Back to top button