मध्य रेल्वे : अवघ्या ५८ मिनिटांमध्ये किडनी, लिव्हर कल्याणहून दादरला | पुढारी

मध्य रेल्वे : अवघ्या ५८ मिनिटांमध्ये किडनी, लिव्हर कल्याणहून दादरला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वे : मुंबईकरांना वेगवान प्रवास घडविणाऱ्या लाेकलने वेळाेवेळी आपले महत्व अधाेरेखित केले आहे. कल्याणच्या रुग्णालयातून लिव्हर आणि किडनी परेल येथील रुग्णालयात जलद गतीने आणि सुरक्षितरित्या पाेहाेचविण्याचे काम गुरुवारी मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. अवघ्या ५८ मिनिटांत कल्याण ते दादर प्रवास करण्यात आला.

अवयवांची वाहतुक करण्यासाठी कल्याण ते दादर लाेकल प्रवास करणाऱ्या रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना काेणत्याही पद्धतीचा त्रास हाेऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना कल्याण आणि दादर स्थानकातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी सकाळी आठ वाजता मुख्यालयातून मिळाली.

त्यानुसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सज्ज केली. सकाळी ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारास रुग्णालयाचे पथक कल्याण स्थानकात दाखल झाले. स्टेशन मास्तरांच्या उपस्थितीत कल्याण स्थानकात अवयव घेऊन रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांंनी सकाळी ११.३८च्याकसारा-सीएसएमटी लाेकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून दादरच्या दिशेने प्रवास सुरु केला.

यावेळी रेल्वेच्या आरपीएफ जवानांची विशेष टीम साेबत हाेती. सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानकावरची गर्दी हटवण्यास मदत केली. ब्रेन डेड रुग्णाची किडनी आणि लिव्हर कल्याणच्या एका खासगी रुग्णालयातून परळमधल्या रुग्णालयात पोहोचवण्याचे काम रेल्वेने करुन दाखवले. याआधी देखील टाळेबंदीमध्ये कर्कराेग रुग्णांना औषधे पाेहाेचविण्याचे काम मध्य रेल्वेने केले आहे.

मध्य रेल्वे वरील दुसरी घटना

जलद गतीने एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात अवयव पाेहाेचविण्याची ही मध्य रेल्वेवरील दुसरी घटना आहे. १६ फेब्रुवारी २०१९राेजी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून परेलच्या ग्लाेबल रुग्णालयात अवघ्या ३८ मिनिटात लिव्हर पाेहाेचविले हाेते.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button