

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना 'व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी…', असं विधान केलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मनातील भावना बोलवून दाखवली असेल. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. पण आज तसे होताना दिसत नाही. सध्या भाजप सक्षम विरोधी पक्ष म्हणून चांगल काम करत आहे, असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीस म्हणाले की, शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याचे आम्हाला दु:ख होणार नाही. राज्यातील हे सरकार अनैतिक सरकार आहे. त्यांनी मी शुभेच्छा देतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भावना दुटप्पी आहे.
केंद्रावर टीका का करणाऱ्या सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या सरकारचा खरा चेहरा समोर येत आहे. तीन चाकांचे सरकार जास्त काळ चालू शकणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे नेतृत्व मोदीजींच्याकडे असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
कोरोना काळात देशाच्या प्रत्येक नागरिकाला सुविधा देण्यासाठी पीएम मोदींनी विविध योजना राबवल्याचेही फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना 'व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी…', असं विधान केले. यावेळी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते व्यासपीठावर उपस्थित होते .
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपचे नेते असा उल्लेख केल्यानंतर भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांकडे पाहिले. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.