Sanjay Raut Tweet : राज्यपालांकडून पदमुक्त होण्याचे संकेत; संजय राऊत यांचे  खोचक ट्विट  | पुढारी

Sanjay Raut Tweet : राज्यपालांकडून पदमुक्त होण्याचे संकेत; संजय राऊत यांचे  खोचक ट्विट 

पुढारी ऑनलाईन डेस्क : “राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते” असं खोचक ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  (Sanjay Raut Tweet)

एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्‍या वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली. राज्यपालांना पदावरुन हटवावे, अशी मागणी होवू लागली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होण्याचे संकेत दिले आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. यानंतर संजय राऊत यांनी  ट्विट केले.

Sanjay Raut Tweet : राजभवनाची खिंड पडली

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी  ट्विटमध्‍ये  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिन्ह मशालचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!

हेही वाचा

Back to top button