Rane Vs Sushama Andhare : नितू-नीलु हे आपले भाचे अगाव लेकरु; सुषमा अंधारेंचा राणेबंधुवर निशाणा

Rane Vs Sushama Andhare
Rane Vs Sushama Andhare
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपला नीलु (Nilesh Rane) आणि नितू (Nitesh Rane) हे आपले भाचे आहेत ते प्रचंड अगाव लेकरु आहेत. त्यांचा अभ्यास कमी आहे. आमच्या भावाचे लक्ष त्यांच्याकडे कमी आहे. त्यांच्यावर संस्कार आणि वळण कमी झाले आहेत. असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी केले. आज सकाळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी राणे बंधुसह (Rane Vs Sushama Andhare) उपमुख्यमंत्री फडणवीसांवरही निशाणा साधला.

Rane Vs Sushama Andhare : संस्कार आणि वळण कमी

खरा शिवसैनिक दुसऱ्यांना हात दाखवून नाही तर; स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवत स्वत:च कर्तुत्व दाखवतो आणि मराठी माणसांचे भवितव्य घडवण्याची धमक ठेवतो. असं वक्तव्य अंधारे (Sushama Andhare) यांनी माध्यमांशी बोलताना केले. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर "हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?" असं ट्विट करत त्यांनी सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ शेअर केला  आहे. यावरुन विचारलं असता ते म्हणाले, 'नीलु आणि नितू हे आपले भाचे आहेत. ते प्रचंड अगाव लेकरु आहेत. त्यांचा अभ्यास कमी आहे. आमच्या भावाचं लक्ष त्यांच्याकडे कमी आहे. त्यांच्यावर संस्कार आणि वळण कमी झाले आहेत.' पुढे त्या असेही म्हणाल्या की, त्यांना हेतरी कळलं पाहिजे की, जो व्हिडिओ तुम्ही ट्विट केला आहे, त्या व्हिडिओमधील सुषमा अंधारेंची चेहरापट्टी काय दिसते. जो व्हिडिओ २० वर्षापूर्वी केंद्रीय युवा स्पर्धेतील आहे. तो व्हिडिओ ओढून ताणून तुम्ही आणता. मी कणवलीत जावून त्यांचा होमवर्क घेतला त्यामुळे ते अस्थीर झाले आहेत. आपलेच भाचे आहेत समजून घ्यायला पाहिजेत.

काही लोक नाराज होवून पक्षांतर करत आहेत, त्यांची नाराजी दुर करणार का? यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, काही लोक कार्यक्रम घेवून ते फोटो शेअर करत सांगत आहेत त्यांनी पक्षांतर केलं आहे. हे खोट आहे असही त्या म्हणाल्या.

गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी

संभाजी महाराजांनी ट्विट केलं आहे की, 'भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!' यावर विचारले असता सुषमा अंधारे म्हणाल्या, 'गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी ठरले आहेत. हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. गृहमंत्र्यांना विसर पडतो की, ते एका राज्याचे गृहमंत्री आहेत. एकाच पक्षाचे गृहमंत्री असल्यासाऱखे ते वागत आहेत. त्यामुळे त्यांच्यात जो सिलेक्टिव्हपणा आहे तो इतक्या वाईटपणे दिसतो की, एकीकडे बाजूला सरका म्हंटल्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारे गृहमंत्री त्याचवेळी अनेक ठिकाणी महिलांबद्दल अपशब्द बोलले जातात तेव्हा मात्र गृहमंत्री काहीच बोलत नाहीत. गुळमुळीत उत्तर देतात. गृहमंत्री सावरकर वादावर आक्रमकपणे बोलतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर मात्र तलवारी म्यान करतात. चकार शब्द बोलत नाहीत असं म्हणतं त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news