काँग्रेस नेत्याने घेतली आमदार राम शिंदेची भेट; रोहित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत | पुढारी

काँग्रेस नेत्याने घेतली आमदार राम शिंदेची भेट; रोहित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

अक्षय मंडलिक

पुढारी ऑनलाईन डेस्क: कर्जत जामखेड मतदार संघ गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या निवास्थानी वेगवेगळ्या पक्ष्याचे कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच कर्जत जामखेडचे खूप दिवस काँग्रेसमध्ये आपलं वर्चस्व गाजवलेले नेते प्रवीण घुले पाटील यांनीही २६ नोव्हेंबरला शिंदे यांच्या घरी हजेरी लावली.

या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटी मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही, मात्र घुले राम शिंदेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. आता प्रवीण घुले यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्याने रोहित पवार यांना मोठा धक्का बसल्याच्या चर्चा मतदार संघात सुरू झाल्या आहेत. कर्जत जामखेड मतदार संघात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे साहेब ॲक्टिव मोड मध्ये आल्याचे दिसत आहेत, तर रोहित पवार या विषयावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button