मनोज पाटील याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये साहिल खानचं नाव
मुंबई; पुढारी ऑनलाईन : मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्याने अभिनेता साहिल खानला जबाबदार धरले आहे. सुसाईड नोट ओशिवारा पोलिस अधिकाऱ्याच्या नावाने लिहिली आहे. मनोजला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- आर्या आंबेकर हिचा डेटिंगच्या चर्चेवर खुलासा; मात्र ती पोस्ट गायब
- Apple iPhone 13 series : ‘अॅपल’कडून नव्या उत्पादनांची आतषबाजी
सुसाईड नोटमध्ये मनोजने साहिल खानवर छळवणूक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत मनोजने सोशल मीडियावर एक ऑडिओ पोस्ट केला आहे.
मनोजवर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी रात्री त्याने गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
- कर्ज मंजूर होऊनही पैसे न दिल्याने माजनाळच्या तरुणाची आत्महत्या
- कब्रस्तान ते अब्बाजान; उत्तरप्रदेश पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाकडे
२९ वर्षीय मनोज पाटील एक प्रोफेशनल फिटनेस, मॉडेल आहे. तो ट्रेनरही आहे. त्याने २०१६ मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशीप जिंकली होती. त्याने वयाच्या २१ वर्षी ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
कोण आहे साहिल खान?
मनोजने ज्याच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे तो साहिल खान देखील फिटनेस ट्रेनर आहे.
साहिल खानने ‘नाचगें सारी रात’ या म्युझिक व्हिडिओमधून करिअरला सुरुवात केली होती. एन. चंद्रा यांच्या स्टाइल चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका केली होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. Xcuse Me मध्येही त्याने काम केले आहे. साहिलने नेगर खान सोबत २००३ मध्ये लग्न केले होते. मात्र २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
हे ही वाचा :
- ५० टक्के मर्यादेत ओबीसींना राजकीय आरक्षण देणार! राज्य सरकारचा निर्णय
- Jaan Mohammad Shaikh : मुंबई हादरवण्याचा डाव उधळला, सहा अतिरेकी जेरबंद
- DSP Viral Video Case : अश्लिल व्हिडिओ प्रकरणी डीएसपीच्या बंगल्यातून मिळाल्या ‘या’ वस्तू!