परभणी: जिंतूर येथे हॉटेल मालक, नोकरांच्या मारहाणीत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; ४ जणांना अटक | पुढारी

परभणी: जिंतूर येथे हॉटेल मालक, नोकरांच्या मारहाणीत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; ४ जणांना अटक

जिंतूर: पुढारी वृत्तसेवा : हॉटेलचे मालक व नोकरांनी केलेल्या जबर मारहाणीत महाराष्ट्र सुरक्षा दलातील (एमएसएफ) विशेष पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना जिंतूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील हॉटेल सपनामध्ये घडली. अजगर खाजा शेख (वय ३३, मूळ रा. येळीकेळी, ता. औंढा) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते रायगड येथे सेवा बजावत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,  अजगर शेख हे नाष्टा करण्यासाठी सपना हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी किरकोळ कारणातून हॉटेलचे मालक व नोकरांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करु देणार नसल्याचा पावित्रा घेतला. त्यामुळे परभणीचे पोलीस अधीक्षक परदेशी व गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी अशोक घोरबांड तत्काळ रुग्णालयात येऊन नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर नातेवाईकांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसांत ४ जणांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा  

Back to top button