DSP Viral Video Case : अश्लिल व्हिडिओ प्रकरणी डीएसपीच्या बंगल्यातून मिळाल्या 'या' वस्तू! - पुढारी

DSP Viral Video Case : अश्लिल व्हिडिओ प्रकरणी डीएसपीच्या बंगल्यातून मिळाल्या 'या' वस्तू!

जयपूर; पुढारी ऑनलाईन : DSP Viral Video Case महिला कॉन्स्टेबल सोबतचा स्विमिंग पूलमधील अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थान पोलिस सेवेतील निलंबित डीएसपी हिरालाल सैनी याचे कारनामे समोर आले. या प्रकरणी चौकशी करत असलेल्या पोलिसांच्या एसओजी पथकाला काही महत्वाची माहिती हाती लागली आहे.

डीएसपी हिरालाल सैना याचा महिला कॉन्स्टेबलसोबतचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या (DSP Viral Video Case) चौकशीदरम्यान सैनीच्या सरकारी बंगल्याची झाडाझडती घेण्यात आली.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, हिरालाल सैनीच्या बंगल्यातून पोलिसांच्या पथकाला तीन मोबाईल आणि पेन ड्राइव्ह मिळाले आहेत. यातून आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबल ज्यावेळी स्विमिंग पूलमध्ये अश्लिल कृत्ये करत होते त्यावेळी त्यांच्यासोबत छोटा मुलगाही होता. या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसांकडून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी डीएसपी हिरालाल याला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. महिला पोलिस कॉन्स्टेबलला देखील निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून चौकशी सुरु आहे.

एका वृत्तानुसार, डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबलचे गेल्या ५ वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्यासाठी तिने आपल्या पतीला सोडून दिले आहे. सैनीने हॉटेलची खोली पोलिस ठाण्याच्या प्रभारीमार्फत बूक केली होती. खोली सोबत असलेल्या खासगी स्विमिंग पूलमध्ये दोघांनी अश्लिल कृत्ये केली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबलचा डीएसपी सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉन्स्टेबलच्या पतीने पोलिसात तक्रार दिली आहे. त्याला आता पत्नीपासून घटस्फोट हवा असल्याचे समजते.

अश्लिल व्हिडिओ प्रकरण पोहोचले विधानसभेत…

दरम्यान, डीएसपीच्या अश्लिल व्हिडिओ प्रकरणाचा मुद्दा राजस्थान विधानसभेत गाजला. भाजप आमदार अभिनेश महर्षी यांनी स्थगन प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान हिरालाल सैनी याचे नाव न घेता एका पोलिस अधिकाऱ्यामुळे राजस्थान पोलिस बदनाम झाल्याचे म्हटले.

पोलिस अधिकारी मिळून या प्रकरणाची तक्रार नोंद होऊ देत नाहीत. या प्रकरणाचे कनेक्शन कुठे आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button