बीड : करुणा शर्मा यांच्या जामिनावर शनिवारी सुनावणी | पुढारी

बीड : करुणा शर्मा यांच्या जामिनावर शनिवारी सुनावणी

अंबाजोगाई ; पुढारी वृत्तसेवा : मंत्री धनंजय मुंडेंविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मां यांच्या जामिन अर्जावर सुनावणीसाठी आज मंगळवारची तारिख देण्यात आली होती. मात्र ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार होती ते न्यायालय रजेवर असल्याने या प्रकरणावर पुढील सुनावणी शनिवार (दि. १८ ) रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करत शर्मा उर्फ करुणा मुंडे परळीत आल्या होत्या. मात्र या ठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली त्‍यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

शर्मा यांनी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी आज (मंगळवार) (दि. १४) होणार होती. मात्र ज्या अति. जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती एस.एस. सापटणेकर रजेवर असल्याणे जामिण अर्जावर आता शनिवारी सुनावणी होणार आहे. त्‍यामुळे शर्मा (मुंडे) यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

पहा व्हिडिओ : धनंजय महाडिक यांच्या घरचा गणेशोत्सव

Back to top button