खासदार प्रिन्स पासवान यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल - पुढारी

खासदार प्रिन्स पासवान यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: खासदार प्रिन्स पासवान यांच्या विरोधात दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. खासदार प्रिन्स पासवान यांच्‍याविरोधात तीन महिन्‍यांपूर्वी लाेजपच्‍या महिला कार्यकर्तीने तक्रार दिली हाेती.

प्रिन्स हे ज्येष्ठ नेते स्व. रामविलास पासवान यांचे पुतणे, खासदार चिराग पासवान यांचे चूलत बंधू आहेत.

तीन महिन्यांपूर्वी पीडित महिलेने पासवान यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.

याप्रकरणी तब्बल तीन महिन्याने गुन्हा दाखल झाला आहे.

बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या प्रिन्स पासवान यांच्याविरोधात बलात्कार तसेच धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

पोलिसांत तक्रार करुनही गुन्हा दाखल होत नसल्याने महिलेने गेल्या जुलै महिन्यात न्यायालयात धाव घेतली होती. दुसरीकडे आपल्यावर केले जात असलेले आरोप निराधार आणि राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा दावा प्रिन्स पासवान यांनी केला होता.

काही महिन्यांपूर्वीच लोजपचे दोन तुकडे झाले होते. चिराग पासवान यांना सोडून गेलेल्या पाच अन्य खासदारांमध्ये प्रिन्स पासवान यांचाही समावेश होता.

हेही वाचलं का ? 

व्‍हिडिओ

Back to top button