विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर बीसीसीआयचा मोठा खुलासा - पुढारी

विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर बीसीसीआयचा मोठा खुलासा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्त येत आहेत. जेव्हापासून बीसीसीआयने टी २० वर्ल्डकपसाठी एम. एस. धोनीची मेंटोर म्हणून नियुक्ती झाली आहे तेव्हापासून तर विराट मर्यादीत षटकांचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवणार असल्याचे वृत्त आले आहे. विराट टी २० वर्ल्डकप नंतर आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचेही हे वृत्त आले होते.

मात्र बीसीसीआयने विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर मोठा खुलासा केला आहे. बीसीसीआयचे खजीनदार अरुण धुमल यांनी सोमवारी विराट मर्यादीत षटकांची कॅप्टन्सी सोडणार असल्याचे वृत्त खोडून काढले. त्यांनी सांगितले की बीसीसीआयमध्ये या विषयावर अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. विराट तीनही प्रकारात संघाचे नेतृत्व करत राहील असे ते म्हणाले.

धुमल म्हणाले ‘हे सगळं वेडेपणाचं आहे. असं काहीही होणार नाही. हे सगळ माध्यमांनी तयार केलेलं आहे. बीसीसीआयमध्ये या विषयावर अशी कोणतीही बैठक किंवा चर्चा झालेली नाही.’

विराट कोहलीने ४५ टी२० आणि ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील २७ टी२० आणि ६५ एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला.

टी २० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर पासून युएईमध्ये सुरु होणार आहे. भारत आपले टी २० अभियान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरु करणार आहे. हा सामना २४ ऑक्टोबरला होणार आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तर या ग्रुपमध्ये अजून पात्रता फेरीतील दोन संघांचा समावेश होणार आहे.

टी२० वर्ल्डकपची पहिली सेमी फायनल १० नोव्हेंबरला अबु धाबीत होणार आहे. तर दुसरा सेमी फायनल सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला दुबईत होईल. या दोन्ही सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. टी२० वर्ल्डकपचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला दुबईत होणार आहे. अंतिम सामन्यासाठाही १५ नोव्हेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

हेही वाचले का? 

 

Back to top button