Quad leaders Summit 2021 : पीएम मोदींसह चार देशातील पंतप्रधान अमेरिकेत एकत्र भेटणार | पुढारी

Quad leaders Summit 2021 : पीएम मोदींसह चार देशातील पंतप्रधान अमेरिकेत एकत्र भेटणार

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : Quad leaders Summit 2021 : भारत आणि अमेरिकेसह चार देशांचे मजबूत संघटन असलेल्या क्वाड कॉन्फरन्समध्ये (Quad summit) सामिल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) या महिन्यात अमेरिकेला भेट देणार आहेत. ही परिषद २४ सप्टेंबरपासून सूरू होणार असून पहिल्यांदाच क्वाड शिखर परिषदेचे चार देशांचे प्रमुख समक्ष या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. (Quad leaders Summit 2021)

यापूर्वी, क्वाडच्या बैठका वर्च्युअल पद्धतीने आयोजित केल्या होत्या. पीएम मोदी व्यतिरिक्त, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा हे देखील या परिषदेत उपस्थित असणार आहेत.

विविध विषयांवर चर्चा

या परिषदेत कोरोना, हिंदी पॅसिफिक महासागर प्रदेश, सायबरस्पेस आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे.

भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाणार आहे.

दरम्यान अमेरिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन समक्ष भेटणार आहेत.

कोरोना काळात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा परदेश दौरा आहे. यापूर्वी पीएम मोदी बांगलादेशला गेले होते. २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदी यांचे भाषण देखील होण्याची शक्यता.

चीन विरोधात सगळे एकत्र

क्वाड समिती ही चीन विरोधात रणनिती आखण्यासाठी केलेली समिती असल्याचा आरोप अन्य देशाकडून करण्यात आला आहे. दरम्यान यावर भारताकडून याचे खंडण करण्यात आले आहे.

रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी त्याला आशियाई नाटो असेही म्हटले. नाटो ही युरोपीय देशांसोबत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक लष्करी आघाडी आहे.

व्हाईट हाऊसचा प्रवक्ता जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत ही परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यामध्ये, पहिल्या क्वाड शिखर परिषदेचे आयोजनाचे अध्यक्ष जो बिडेन २४ सप्टेंबर रोजी संबोधीत करणार आहेत.

या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा एकत्र येणार आहेत.

Back to top button