Hair Straightening : केसांना स्ट्रेटनिंग करणाऱ्या रासायनिक उत्पादनांमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका | पुढारी

Hair Straightening : केसांना स्ट्रेटनिंग करणाऱ्या रासायनिक उत्पादनांमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या केसांना सरळ करण्यासाठी (Hair Straightening) वापरण्यात आलेल्या उत्पादनांमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका महिलांमध्ये वाढतो, असे एका अभ्यासात सांगण्यात आले आहे. केसांना स्ट्रेटनिंग करण्यात येणाऱ्या उत्पादनातील रसायनाशी संबंधित हा अभ्यास आहे. ज्या महिला स्ट्रेटनिंगचा वापर करत होत्या, त्यांच्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर विकसित होण्याची शक्यता दुप्पट होती. (Hair Straightening)

एका अभ्यासातून सांगण्यात आले की, हेअर स्ट्रेटनिंग करणाऱ्या उत्पादनांमधील रसायनांमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) द्वारा करण्यात आलेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी अमेरिकेत ३५-७४ या वर्गातील ३३,४९७ महिलांची माहिती एकत्र केली. ज्यांनी आधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हायरमेंटल हेल्थ सायन्सेज (एनआययएचएस) च्या नेतृत्वाखालील एका अभ्यासात भाग घेतला होता.

जवळपास ११ वर्षांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरची ३७८ प्रकरणे समोर आली. एनआययएचएसचे प्रमुख, एलेक्जेंड्रा व्हाईट यांच्या पीएचडी नुसार सांगण्यात आले की, “आम्ही अनुमान लावला आहे की, १.६४ टक्के महिला ज्यांनी कधी हेअर स्ट्रेटनरचा वापर केला नाही, त्यांना वय़ाच्या ७० व्या वर्षांपर्यंत गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. पण, अनेकदा नेहमी स्ट्रेटनिंग करमाऱ्या महिलांमध्ये हा धोका ४.०५% पर्यंत वाढतो.”

संशोधनात हे आढळले आहे की, ज्या महिला हेअर स्ट्रेटनिंग उत्पादनांचा वापर करत होत्या, त्यांच्यात गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका त्या महिलांच्या तुलनेत दुप्पट होता, ज्या महिला या उत्पादनांचा वापर करत नव्हत्या. ज्या महिला या उत्पादनांचा वापर करत होत्या, त्यांच्यात कॅन्सर होण्याची दुप्पट शक्यता होती. हा फार दुर्मिळ गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधकांनी महिलांकडून वापरण्यात आलेल्या केसांच्या उत्पादनांबद्दलची माहिती एकत्र केली नाही. पण, त्या उत्पादनांत असणारी अनेक रसायने पॅराबेन्स, बिस्फेनॉल ए, मेटल आणि फॉर्मल्डेहाइड गर्भाशयात कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

Back to top button