Pollution in Delhi : दिवाळीपूर्वीच राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषित; ‘रेड झोन’मध्ये वायू गुणवत्ता

Pollution in Delhi : दिवाळीपूर्वीच राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषित; ‘रेड झोन’मध्ये वायू गुणवत्ता

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू गुणवत्ता  (Pollution in Delhi) दिवसागणिक खराब श्रेणीत पोहोचत आहे. वातावरणातील बदलामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वायू गुणवत्ता 'रेड झोन'मध्ये पोहोचली आहे. शनिवारी (दि.२२) सकाळ पासूनच दिल्लीतील वेगवेगळ्या भागांमध्ये धुरक्यांची चादर बघायला मिळाली. सकाळी वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २६२ नोंदवण्यात आला. इंडिया गेट तसेच कर्तव्य पथावर देखील धुरक्यांची चारद पसरल्याचे बघायला मिळाले.

शुक्रवारी एनसीआरमधील फरीदाबादमध्ये एक्युआय ३१२ नोंदवण्यात आला.या निर्देशांकातील वायू गुणवत्ता (Pollution in Delhi)अत्यंत निष्कृष्ठ श्रेणीतील असते. शनिवारपासून दिल्ली तसेच एनसीआरमधील वायू गुणवत्ता आणखी बिघडण्याची शक्यता वायू गुणवत्ता मापक एजन्सीकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये वायू गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशात दिवाळीनंतर मंगळवारी वायू गुणवत्ता श्वास घेण्यास अत्यंत घातक श्रेणीत पोहोचू शकते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार (सीपीसीबी) दिल्लीत वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत पोहोचला आहे. दिल्ली लगतच्या राज्यांमधे पीक काढणीनंतर शेतातील तण जाळले जात आहे. दिल्लीच्या बाहेरील भागातही तण जाळले जात असल्याने प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे. तूर्त राज्यातील प्रदूषणात तण जाळल्यानंतरचा धूर जबाबदार नसल्याचे समोर आले आहे. दिवाळीनंतर मात्र तण जाळण्याच्या संख्येत बरीच वाढ होईल. यासोबतच तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता असल्याने प्रदूषकांना जमण्यास मदत मिळेल, त्यामुळे वायू गुणवत्तेत वेगाने घट होईल, असे भाकित हवामान तज्ञांनी वर्तवले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news