Celebrities Marriage : 'या' सेलेब्सनी सिद्ध केलं की, प्रेमाला वय नसतं | पुढारी

Celebrities Marriage : 'या' सेलेब्सनी सिद्ध केलं की, प्रेमाला वय नसतं

पुढारी ऑनलाईन डेस्क : असं म्हणतात की, प्रेमासाठी वयाचं कुठलेही बंधन नसतं. प्रेम कुणालाही कधीही होऊ शकतं. प्रेमासोबत हे नियम आता लग्नाबद्दलही लागू होतात. आता आपण पाहिलं तर लग्नाच्या वयाचा आकडा वाढत वाढत चालला आहे. (Celebrities Marriage) जसजसा काळ पुढे जात आहे, तसतसा हा वयाचा आकडादेखील वाढत चालला आहे. जेव्हा व्यक्तीला त्याचा खरा लाईफ पार्टनर मिळतो, तेव्हा तो लग्न करण्यासाठी तयार होतो. याचं उत्तम उदाहरण बॉलीवूडमध्ये पाहायला मिळतं. बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, ज्यांनी वयाची चाळीशी पार केल्यानंतर लग्न केलं आहे. तर पाहुया, या सेलिब्रिटींमध्ये कोण कोणाचा समावेश आहे. (Celebrities Marriage)

कबीर बेदी

अभिनेता कबीर बेदीने एक नाही दोन नाही, तर चार लग्ने केली आहेत. त्यांचे पहिले लग्न १९६९ मध्ये प्रोतिमा बेदीसोबत झाले होते. परंतु, दोघांचे काही ‍वर्षांनी घटस्फोट झाला होता. पुढे कबीर बेदी यांनी फॅशन डिझायनर सुशासन हम्फ्रेस सोबत लग्न करून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. परंतु, त्यांचे हे नाते यशस्वी ठरले नाही. त्यांचा घटस्फोट झाला. कबीर बेदी यांनी तिसऱ्यांदा रेडिओ प्रेजेंटर निक्की बेदी सोबत लग्ने केलं होतं. इथेही त्यांचं नातं टिकलं नाही. तीन लग्ने तुटल्यानंतर कबीर बेदी यांचा प्रेमावरून विश्वास नाहीसा झाला. पण, पुढे मात्र ७० व्या वाढदिवसाला ६ जानेवारीला त्यांनी ४२ वर्षाच्या परवीन सोबत लग्न करण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. परवीन- कबीर बेदी यांच्या वयात तब्बल २९ वर्षांचं अंतर आहे.

नीना गुप्ता

नीना गुप्ताचे वैयक्तिक जीवन नेहमीच चर्चेत राहिले आहे. तिने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्सला डेट केलं होतं. यादरम्यान, तिने एका मुलीला (मसाबा) देखील जन्म दिला. नीना गुप्ता-विवियन यांनी लग्न केले नव्हते. पुढे २०१८ मध्ये दिल्लीचा सीए विवेक मेहरासोबत तिने सात फेरे घेतेल. त्यावेळी नीना ५० वर्षांची होती. दोघांचे लग्न अमेरिकेत झालं होतं.

मान्यता दत्त-संजय दत्त

संजयने तीन लग्न केली. पहिले लग्ने १९८७ मध्ये ऋचा शर्माशी झाले होते. त्यांना एक मुलगी त्रिशला आहे. दुर्दैवाने ऋचाचे ब्रेन ट्यूमरमुळे निधन झाले. अनेक वर्षांनंतर त्याने रिया पिल्लईशी लग्न केले. दोघांचं नातं फार काळ टिकंल नाही. दोघेही वेगळे झाले. वयाच्या ४८ व्या वर्षी २००८ मध्ये त्याने मान्यताशी लग्न केले.

प्रीती जिंटा

बॉलिवूडची सोल्जर गर्ल अभिनेत्री प्रीती जिंटाने वयाच्या ४० व्या वर्षी अमेरिकन बिजनेसमन, बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्ने केले होते. दोघांनी गुपचुपपणे लग्न केले होते. प्रीति गुडइनफपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

उर्मिला मातोंडकर

बॉलिवूड इंडस्ट्रीची ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने वयाच्या ४२ व्या वर्षी कश्मीरी बिजनेसमॅन आणि मॉडल मोहसिन अख्तरसोबत लग्न केलं. मोहसीन उर्मिलापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. दोघांच्या लग्नात खूप कमी लोकांनी हजेरी लावली होती.

Back to top button