Breathe Into The Shadows ३ : अभिषेकच्या ‘ब्रीद इनटू द शॅडो ३’ चा सस्पेन्सनी भरलेला टिझर रिलीज

Breathe Into The Shadows ३
Breathe Into The Shadows ३
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा वेब सीरिजच्या जगात परतला असून त्याचा आगामी बेवसीरीज 'ब्रीद इन टू द शॅडो २' पार्टनंतर आता बेवसीरीजचा नवा पार्ट चाहत्याच्या भेटीस येत आहे. याआधी या वेब सीरिजचे धमाकेदार एक पोस्टर शेअर करण्यात आलं होते. यानंतर सध्या 'ब्रीद इन टू द शॅडो ३' ( Breathe Into The Shadows ३ ) चा सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला टीझर रिलीज करण्यात आला आहे. यासोबत या चित्रपटाची रिलीज डेटची माहिती समोर आली आहे.

अभिनेता अभिषेक बच्चनच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'ब्रीद इन टू द शॅडो ३' ( Breathe Into The Shadows ३ ) वेब सीरिजचे एक पोस्टर आणि टीझर पाहायला मिळतोय. यात पहिल्यादा शॅडो मोठ- मोठा होताना दिसतोय तर त्याच्या समोर असणारी व्याक्ती भितीने कापताना दिसतेय. यानंतर वेब सीरिजमध्ये हॉस्पिटल, रूग्ण, रेल्वे, सुरा, जाळपोळ, किडनॅप केलेली व्यक्तीसोबत अॅक्शन सीन आणि अनेक सस्पेन्स दिसत आहेत. या टिझर चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'Four down. Six to go ?, The shadows are about to turn darker, #BreatheIntoTheShadows, new season, Nov 9'. असे लिहिले आहे. यावरून अभिषेकची ही वेबसीरीज येत्या ९ नोव्हेबर २०२२मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासोबत शेअर झालेल्या पोस्टरमध्ये एक व्यक्ती पाठमोरी उभी असल्याचे दिसत आहे. या वेब सारीजमध्ये अभिषेक आणि अमित साध यांच्यासोबत नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौर यांनी भूमिका साकारल्या आहेत. या सीझनमध्ये ८ एपिसोड्स असून त्याचे दिग्दर्शन मयंक शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर ९ नोव्हेबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news