Rupee slips further : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; सर्वोच्च निचांकी पातळीवर | पुढारी

Rupee slips further : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; सर्वोच्च निचांकी पातळीवर

पुढारी ऑनलाईन: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 56 पैशांनी आज ( दि. २६ ) पुन्हा घसरला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपयाची किंमत ही 81.54 रुपये इतकी कमी (Rupee slips further) झाली आहे. सुरूवातीला अमेरिकन चलनाच्या मजबूती आणि स्थानिक बाजारात रुपयाबद्दल गुंतवणूकदारांमध्ये असलेली जोखीमीची भावना यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला आहे.

सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात रुपया 43 पैशांनी घसरला. त्यानंतर  डॉलरच्या तुलनेत रुपयाने 81.54 ही आजवरची सर्वोच्च निचांकी पातळी गाठली आहे.

रशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे भू-राजकीय जोखीम वाढणे, देशांतर्गत असमानतेच्या भावनेमुळे निर्माण झालेला नकारात्मक कल आणि लक्षणीय परदेशी निधी बाहेर पडणे यामुळे गुंतवणूकदारांची भूक कमी झाली, असे विदेशी मुद्रा व्यापार्‍यांचे मत आहे. जगभरातील आंतरबँकीय परकीय चलनात, प्रथम ग्रीनबँकच्या तुलनेत रुपयाने 81.47 इतक्या किंमतीने सुरूवात केली, नंतर त्यापूर्वीच्या बंदच्या तुलनेत 43 पैशांनी घसरून तो 81.54 वर आला. शुक्रवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (Rupee slips further) रुपया 30 पैशांनी घसरून 81.09 च्या नीचांकी पातळीवर येऊन थांबला होता.

यावर बोलताना, रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक श्रीराम अय्यर म्हणाले की, सध्या तरी भारतीय रुपया कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे, की यूएस फेड महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात आक्रमकपणे वाढ करत राहील. या आठवड्यात आरबीआयच्या बैठकीकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा निर्णय शुक्रवारी होणार आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, रिझव्‍‌र्ह बँकेकडून महागाई कमी होण्यासाठी आणि रुपया आणखी कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी RBI व्याजदर 50 bps ने वाढवतील, असेही अय्यर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button