जीडीपी 5 ट्रिलियन डॉलर्सवर जाणार | पुढारी

जीडीपी 5 ट्रिलियन डॉलर्सवर जाणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्ष २०२६-२७ पर्यंत देशाच्या जीडीपीचा आकार 5 ट्रिलियन डॉलर्सवर जाईल, असा आशावाद मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्‍वरन यांनी मंगळवारी यूएनडीपी इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्‍त केला.वर्ष 2033-34 पर्यंत अर्थव्यवस्था 10 ट्रिलियनवर जाऊ शकते, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तविले.

जगातील अन्य विकसनशील देशांचा विचार केला तर भारत बर्‍यापैकी सुस्थितीत आहे, असे सांगून नागेश्‍वरन पुढे म्हणाले की, सध्याचा जीडीपीचा आकार 3.3 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत हा आकार पाच ट्रिलियन डॉलर्सवर जाणे फारसे कठीण नाही. दरवर्षी सरासरी दहा टक्के इतका जीडीपी दर (डॉलर टर्ममध्ये) जरी गृहीत धरला तरी पुढील दहा वर्षांच्या कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार दहा ट्रिलियन डॉलर्सवर जाऊ शकतो.

हेही वाचा

Back to top button