जून महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च निर्यातीची नोंद! वाणिज्य मालीची निर्यात ३७.९ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या घरात | पुढारी

जून महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च निर्यातीची नोंद! वाणिज्य मालीची निर्यात ३७.९ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या घरात

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशाने जून महिन्यात ३७.९४ अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या वाणिज्य मालाची निर्यात ( India’s Merchandise Exports ) केली असून गतवर्षीच्या ३२.४९ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ही वाढ १६.७८% अधिक असल्याची माहिती वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिली आहे. विशेष म्हणजे यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत ११६.७७ अब्ज डॉलसर्च वाणिज्य मालाची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच तिमाहीतील ९५.५४ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत त्यात २२.२२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत ९८.०१ टक्क्यांची मोठी वाढ

दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत ९८.०१ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.( India’s Merchandise Exports ) यासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू ५०.६६% आणि सर्व कपड्यातील आरएमजी निर्यातीत ४४.६७% वाढ नोंदवली गेली आहे. जून २०२२ मध्ये देशाची वाणिज्य आयात ६३.५८ अब्ज डॉलर्स होती, यात जून २०२१ मधील ४२.१ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ५१.०२% नी वाढ झाली आहे.

एप्रिल-जून २०२२-२३ मध्ये देशाची वाणिज्य आयात १८७.०२ अब्ज डॉलर्स होती.याच काळात गेल्यावर्षीच्या १२६.९६ अब्ज डॉलर्स आयातीपेक्षा ती ४७.३१% अधिक आहे. जून २०२२ मध्ये व्यापार तूट २५.६३ अब्ज डॉलर्स होती, तर एप्रिल-जून २०२२-२३ मध्ये ती ७०.२५ अब्ज डॉलर्स होती, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

 

Back to top button