President Oath : तारीख तीच मात्र वर्ष वेगळे! आतापर्यंत सलग दहावेळा राष्ट्रपती पदाची शपथ २५ जुलैला | पुढारी

President Oath : तारीख तीच मात्र वर्ष वेगळे! आतापर्यंत सलग दहावेळा राष्ट्रपती पदाची शपथ २५ जुलैला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आतापर्यंत सलग दहावेळा २५ जुलै रोजीच राष्ट्रपती पदाची शपथ (President Oath) घेतली गेली आहे. आज द्रौपदी मुर्मू देशाच्‍या १५ वा राष्ट्रपती झाल्या. त्‍यांनी आज सकाळी 10.13 वाजता (दि. २५ जुलै)  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्‍हणजे, सलग दहावेळा २५ जुलै या दिवशीच  राष्ट्रपतीपदासाठीचा शपथविधी (President Oath) कार्यक्रम झाला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या भाग V मधील प्रकरण १ हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याशी संबधित आहे. राष्ट्रपतीपद हे अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. ते भारताचे ‘राज्य प्रमुख’ (Head of the State) असून, देशाचा  सर्व कारभार त्यांच्या नावाने चालविला जातो. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता व अखंडता यांचे प्रतीक असतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५२ मध्ये ‘भारताचा एक राष्ट्रपती असेल’ अशी तरतूद करण्यात आली आहे. कलम ५३(१) नुसार, संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल,अशी तरतूद करण्यात आली आहे. आज भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणुन द्रौपदी मुर्मू यांनी पदभार स्वीकारला.
President Oath : सलग दहावेळा राष्ट्रपती पदाची शपथ                   

२५ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेणाऱ्या द्रौपदी मुर्मू या १० व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. १९७७ नंतर  राष्ट्रपतीच्या पद व गोपनियतेची शपथविधी २५ जुलै रोजीच झाला आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी शपथ घेतली. दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर ते मे १९६२ पर्यंत या राष्ट्रपती पदावर राहिले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १२ मे १९६२ रोजी शपथ घेतली आणि १३ मे १९६७ पर्यंत पदावर राहिले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद यांचे निधन झाल्याने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही.

देशाचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै १९७७ रोजी शपथ घेतली हाेती. २५ जुलै रोजी घेणारे राष्ट्रपती पुढीलप्रमाणे ग्यानी झेल सिंग, आर वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, के.आर. नारायणन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

२५ जुलै रोजी शपथ घेणारे राष्ट्रपती 

  • नीलम संजीव रेड्डी   (25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982)  प्रतिस्पर्धी – बिनविरोध
  • ज्ञानी जैल सिंह   (25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987) प्रतिस्पर्धी – एस.आर.खन्ना
  • रामास्वामी वेंकटरमन (25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992) प्रतिस्पर्धी – व्ही.कृष्ण अय्यर
  • शंकरदयाल शर्मा  (25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997) प्रतिस्पर्धी – जॉर्ज स्वेल
  • के आर नारायनन (25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002) प्रतिस्पर्धी – टि.एन सेशन
  • एपीजे अब्दुल कलाम (25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007) प्रतिस्पर्धी – लक्ष्मी सेहगल
  • प्रतिभा पाटील (25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012) प्रतिस्पर्धी – भैरवसिंह शेखावत
  • प्रणब मुखर्जी  (25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017) प्रतिस्पर्धी – पी.ए.संगमा
  • रामनाथ कोविंद (25 जुलै 2017 ते 25 जुलै 2022) प्रतिस्पर्धी – मीरा कुमार
  • द्रौपदी मुर्मू (25 जुलेै 2022- )  प्रतिस्पर्धी – यशवंत सिन्हा

हेही वाचलंत का?

Back to top button